शहर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा
हिंगोली - येथील शहर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित रविवारी (ता.८) सकाळी अकरा वाजता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थीनी देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेजनै, पोलीस निरीक्षक सय्यद, नितीन केनेकर, मनोजकुमार पांडे, कांबळे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी
उपस्थित महिलांचा सन्मान करुन त्यांचा सत्कार केला.