पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या


खानापूर परिसरातील खळबळजनक घटना, नेहमीचा वाद गेला टोकाला
परभणी,दि.16(प्रतिनिधी)ःपती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीवर धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्या पाठोपाठ स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी(दि.14) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास खानापूर भागात घडली. कृष्णा माने(वय30), कमल जाधव-माने(वय25) असे मृत पती, पत्नीचे नाव आहे.
वसमत रस्त्यावरील खानापूर भागात माने कुटुंबिय वास्तव्यास आहेत. त्या कुटुंबातील कृष्णा माने हे  आई, वडील,पत्नी, एक मुलगा, भाऊ, भावजयसह एकत्रीत राहत होते. दुधगाव शिवारात शेती करणारे माने यांच्या पत्नी कमल जाधव-माने या नानलपेठ पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. पाच वर्षापुर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षापुर्वी मुलगा झाला. त्यामुळे कुटुंब आनंदात होते.मात्र या दांम्पत्यात वादविवाद सुरू झाला. दोघांचेही पटनासे न झाल्याने वादविवादाचे रूपांतर भांडतंट्यात होत. त्यातच कृष्णा माने हे दारूच्या आहारी गेलेले होते. त्यातून या दांम्पत्यातील वाद अलीकडे टोकाला जात होता.
शनिवारी देखील दुपारी दोनच्या सुमारास या दोघांत वाद सुरू झाला.  यावेळी कमल यांचे सासु-सासरे रुग्णालयात ड़ोळे तपासण्याच्या निमित्ताने गेले होते. दोघा पती-पत्नीत वाद सुरू झाल्याने घरातील भाऊ व भावजय कंटाळून बाहेर पडले. यावेळी कृष्णा व कमल यांच्यातील वाद  अक्षरक्षः टोकाला गेला. त्याच क्षणी कृष्णा याने पत्नी कमल हिच्या मानेवर, गळयावर व अंगावर एकापाठोपाठ एक धारधार शस्त्राने वार सुरू केले. याप्रकाराने कमल या जागीच कोसळल्या. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने कमल त्यांचा खोलीत मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यूू झाल्याचे दिसताच क्षणी कृष्णा यानेही स्वतःच्या गळावर वार करून करून घेतले. अतिरक्तस्त्रावामुळे तेही मृत्यूू पावले.यावेळी दोन वर्षाचा मुलगा घरातच होता. त्या चिमुकल्याला हे कळलेच नाही. परंतू हा प्रकार कुटुंबातील सदस्य घरात आल्यावर बरोबर दिसला तेव्हा गदारोळ उडाला.तात्काळ भाऊ-भावजयीने आरडाओरडा केला. तेव्हा घटनास्थळी परिसरातील नागरिक धावून आले. यावेळी पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यातील काहीनी या घटनेची माहिती नवा मोंढा पोलिसांना दिली. पाठोपाठ रुग्णवाहिका मागवली. परंतू त्यापुर्वीच त्या दोघांचे निधन झाल्याचे निदर्शनास आल्याने दोघांचे मृतदेह पोलिस धावून येई पर्यंत जागीच होते.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्‍वर तट यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर पंचनाम्यास सुरूवात झाली. पोलिसांनी घटनेतील धारधारश्त्र म्हणजे वस्तरा जप्त केला. तसेच प्रत्यक्षदर्शीनी कोणी आहे का याचा शोध सुरू केला. तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांकडून जबाब नोंदविण्याचे काम जलदगतीने सुरू केले. नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल सुध्दा जप्त केला. त्या मोबाईलवरील कॉल संदर्भात माहिती घ्यावयास सुरूवात केली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा