नापीकीला कंटाळून एकाची आत्महत्या
पळसगाव येथील घटना
वसमत - सततच्या नापीकाला कंटाळून तुरीच्या ढिगारऱ्याला आग लाऊन त्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता पळसगाव येथे घडली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील पळसगाव येथील बालाजी संभाजी डाखोरे (वय ५५) याने सततच्या नापीकीला कंटाळून व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सापडला होता. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वतःच्या शेतातील आखाड्यावरील तुऱ्हाट्याच्या ढिगाला आग लावून आगीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या बाबत प्रभाकर संभाजी डाखोरे यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बी. आर. बंदखडके हे करीत आहेत.