92 पैकी 66 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह

92 पैकी 66 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह



जिल्ह्यात शनिवार पर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, 11 स्वॅब अहवाल प्रलंबित
परभणी,दि.28(प्रतिनिधी) ः जिल्ह्यात कोरोना विषाणु संदर्भात 141 नागरीकांची नोंद झाली असून त्यामध्ये 92 जणांचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्हीला पाठविण्यात आले होते, त्यातील 66जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 11 अहवाल प्रलंबित आहेत. 15 जणांचे अहवाल रिजेक्ट करण्यात आले आहेत.
यामध्ये परदेशातून आलेले 57 त्यांच्या संपर्कातील 05 व एकूण 141 नागरिक निगराणी खाली आहेत. या नागरीकांपैकी 14 नागरीक जिल्हा रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षामध्ये दाखल आहेत. तर 114 नागरीकांना त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 114 जणांची प्रकृत्ती स्थिर आहे.  त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय पथकामार्फत फेर तपासणी करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी 07 रुग्णांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था(पूणे) कडे पाठविण्यात आला आहे. शनिवारी नव्याने 07 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालासाहेब नागरगोजे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाल्यांची दुकाने पूर्णवेळ सुरु राहणार असून नागरीकांनी विनाकारण गर्दी करु नये, नागरीकांना काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, आपत्ती प्रशासन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात निर्जंतूकीकरणासाठी फवारणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या व्हॅन मार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात निर्जंतूकीकरणासाठी शनिवारी फवारणी करण्यात आली.  जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कोरोना कक्षास भेट देवून पाहणी केली. कक्षात विलगिकरण करण्यात आलेल्या नागरीकांशी संवाद साधला.
जिल्हाधिकार्‍यांनी केली इमारतींची पाहणी
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरीकांना भविष्यात विलगिकरण, अत्यावश्यक वस्तूंचे सेवा केंद्र कार्यान्वित करण्या करीता जिल्हाधिकार्‍यांनी विविध इमारतींची शनिवारी पाहणी केली. शहरातील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम्, धार रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह, जिल्हा परिषदेची नवनिर्माणधीन इमारतीची पाहणी केली. यावेळी आपत्ती प्रशासन पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा