तालुकास्तरीय गो- गर्ल स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग फिट इंडिया अंतर्गत केले जाते स्पर्धेचे आयोजन
तालुकास्तरीय गो- गर्ल स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग
फिट इंडिया अंतर्गत केले जाते स्पर्धेचे आयोजन
हिंगोली - केंद्र शासनाच्या फिट इंडिया अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय १००मीटर धावणे स्पर्धेत शनिवारी (ता.२९) १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या मैदानावर शनिवारी (ता.२९)
गो-गर्ल १००मीटर धावणे स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. गुंडेवार, श्री.पंडित अवचार,श्री. सानप,श्री. खडसे, आदींची उपस्थिती होती.तर पंच म्हणून श्री.रमेश गंगावणे, रामप्रकाश व्यवहारे,श्री. संजय भुमरे, श्री.लोळेवार ,श्री.गंडाफळे ,श्री. पाईकराव, आदींनी काम पाहिले.
या तालुकास्तरीय स्पर्धा तीन वयोगटात खेळविण्यात आल्या. यामध्ये ६ ते ९ वर्ष, १० ते १३ वर्ष व १४ ते १८ वर्षातील मुलीनी सहभाग नोंदवला.तालुकास्तरीय तिन्ही गटातील प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला जिल्हस्तरावर निवड केली जाईल. त्यानंतर जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्यपातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे केवळ शनिवारी हिंगोली तालुक्यातील खेळाडूंसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या.
उर्वरित तालुक्यातील स्पर्धा झाल्यानंतर जिल्हा पातळीवर स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे श्री. संजय भुमरे यांनी सांगितले.