कोरोना विषानू खबरदारीमुळे नरसी येथील यात्रामोहत्सव रद्द
कोरोना विषानू खबरदारीमुळे नरसी येथील यात्रामोहत्सव रद्द
तहसीलदार यांचे नामदेव संस्थानला पत्र
हिंगोली - कोरोना विषानूचा प्रादुर्भाव, प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नरसी येथील दरवर्षी प्रमाणे होणारा यात्रा मोहत्सव रद्द करण्याचे लेखी पत्राद्वारे तहसीलदार गजानन शिंदे यांनी संत नामदेव संस्थानला काळविले आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला असताना जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील यात्रा, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे निर्देश दिले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाय योजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम ९१५१चे कलम ४३ अन्वये जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ,शाळा, जिम, सिनेमागृह, ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.त्याकरिता तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून नरसी येथील संत नामदेव महाराज जन्मस्थळी येथे दरवर्षी प्रमाणे एकादशी निमित्य होणारी भव्य यात्रा मोहत्सव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्याचे पत्र तहसीलदार शिंदे यांनी नरसी देवस्थानकडे सादर केले आहे.त्यामुळे नरसी येथे होणारा यात्रा मोहत्सव रद्द केला असल्याने भाविकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.