शॉर्टसर्किटमुळे सवना येथे ७० हजाराचा ऊस जळून खाक
सेनगाव - तालुक्यातील
सवना येथील शेतकरी मधुकर भोयाळकर यांच्या गट क्रमांक २७७ एक एकर शेतातील उभा ऊस शॉटसर्किट मुळे जळून खाक झाला असल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.
मधुकर भोयाळकर यांनी एक एकरात उसाची लागवड केली होती. आज घडीला ऊस तोडणीसाठी आला असताना शनिवारी अचानक शेतातून गेलेल्या विजेच्या पोलवरील तारांचे घर्षण होऊन शॉटसर्किट झाल्याने यात
आजच्या घडीला तोडणी साठीआलेला ऊस शेतातून गेलेल्या विजेच्या पोलवरील तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने त्यांचे अंदाजे ६० ते ७० हजारांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे .
परिसरात ऊस कारखाना नसल्याने या उसाला शहरातील व ग्रामीण भागातील रसवंतीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते .मात्र शॉर्टसर्किटमुळे तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात ऊस पूर्णतः जळून खाक झाला शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने सर्वच शेताला घेराव घातला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावले असता त्यांना यश आले नाही. अग्निशामक दलाला ही पाचारण करता आले नाही.
![]() | ReplyReply to allForward |