शिष्यवृतीचे अर्ज १६ मार्च पुर्वी निकाली काढा
शिष्यवृतीचे अर्ज १६ मार्च पुर्वी निकाली काढा
समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
हिंगोली - महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृतीचे प्रलंबीत अर्ज महाडीबीटी या संगणक प्रणालीवर 16 मार्च पुर्वी निकाली काढावेत असे आवाहान समाजकल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
सन 2019-20 या वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क-परिक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावयायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडिबीटी या संगणक प्रणालीवर अंतिम दिनांक 16 मार्च 2020 आहे.
यानंतर सदरच्या अर्जावरील कार्यवाही करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांचे लॉगीनवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले आहे.