जिल्हाभरात 47 वाहने जप्त

जिल्हाभरात 47 वाहने जप्त


परभणी,दि.28(प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोकण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणार्‍या 43 आरोपींवर 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून 47 वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून 14 एप्रिल पर्यंत देशभरात संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात नाकाबंदी, चेक पॉइंट लावण्यात आले असून पेट्रोलिंग सुरु आहे. विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. सद्याच्या परिस्थीतीमध्ये कोणी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये किंवा अफवा पसरवून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करु नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा सुरु असून खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतूकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा-सुविधांचा दुरुपयोग करुन विनाकारण काही नागरीक रस्त्यावर फिरत आहेत, अशा नागरीकांविरुध्द पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. संचारबंदी, जमावबंदी असतांना रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंध अधिनियम 1896, आपत्ती प्रतिबंध अधिनियम 2005 व भारतीय दंड विधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
या संबंधाने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 43 आरोपींविरुध्द 23 गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी व लॉकडाऊन पाळत नागरीकांनी घरातच रहावे, अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यांवर फिरणार्‍या नागरीकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी दिला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा