जुगार अड्ड्यावर छापा 46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त








 

 हिंगोली -  जिल्‍ह्‍यात संचारबंदीचे आदेश असताना जुगार खेळणाऱ्यावर स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जुगाऱ्याकडून 46 हजार 390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सतरा जणाविरुध्द शनिवारी  गुन्हा दाखल केला आहे. 

 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या परिसरात भास्‍कर बांगर यांच्या शेतातील धुऱ्याजवळ एका बाभळीच्या झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती स्‍थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्‍याप्रमाणे घटनास्‍थळी शनिवारी छापा टाकला असता यात गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्‍के, शाम कुटे, पुरुषोत्तम बांगर, आजीस सर्व राहणार मंगळवारा हिंगोली. लखन सांगळे राहणार भारतीविद्यामंदिर जवळ हिंगोली, शफी रफीक राहणार मंगळवारा हिंगोली, गजानन राहणार महादेववाडी, शाम थिटे राहणार मंगळवारा, अनिल काळे राहणार तलाब कट्टा, अमोल दरुगे राहणार मंगळवारा हिंगोली, विशाल सांगळे राहणार पोळा मारोती हिंगोली, शंकर सांगळे, महेश थिटे, योगेश थिटे तीघेही राहणार महादेववाडी हिंगोली, शेख इम्रान राहणार बावन खोली. 

 

हे सर्वजन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असताना यापैकी  गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्‍के हे नगदी, मोबाईल, जुगाराचे साहित्य असे एकूण 46 हजार 390 रुपये मुद्देमालासह मिळून आहे. व इतर जण पोलिस आल्याचे पाहुन पळुन गेले. सदर इसमांनी जिल्‍हाधिकारी यांचे संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना व 

सध्या जिल्‍हारात संचारबंदी सुरू असताना व कोरोना साथरोग पसरत असल्याने राष्ट्रीय आपती व्यवस्‍थापन कायद्याचे आदेश न पाळता कोरोना साथीचा संसर्ग परविण्यासाठी स्‍वतःची व इतर जनतेला संसर्ग होऊनये म्‍हणून तोंडाला कोणतेही मास्‍क, कपड्याचा वापर न करता हयगची कृती केली व आदेशाचे पालन केले नाही. 

 

 म्‍हणून या सर्वाविरुध्द राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्‍थापन कायद्यातंर्गत तसेच जुगार कायद्याप्रमाणे पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरिक्षक जे. आर. भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, आशिष उंबरकर, शंकर ठोंबरे, सुनिल आंभोरे, आकाश टापरे, दिपक पाटील, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.


 

 



 



 















ReplyReply to allForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा