विजबिला पोटी दोन महिन्यात ग्राहकाकडून दोन कोटी वसूल
विजबिला पोटी दोन महिन्यात ग्राहकाकडून दोन कोटी वसूल
महावितरणकडून वसुली मोहीम युद्धपातळीवर
हिंगोली - विजवितरण कंपनी कडून फेब्रुवारी अखेर वीज बिलापोटी ग्राहकाकडून दोन कोटी ४९लाख रुपयांची वसुली झाली असून अजूनही युद्धपातळीवर मोहीम सुरु आहे.पथकाने थकबाकी दारांकडे जाऊन वसुली करीत असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून जानेवारी पासून वीज बिलाची वसुली मोहीम सुरू केली आहे. दोन महिन्यात महावितरण कंपनीने वीज बिलापोटी घरगुती, औद्योगिक, पाणीपुरवठा ग्राहकाकडून फेब्रुवारी अखेर दोन कोटी ४९ लाख रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीदाराकडे मोठ्या प्रमाणात रकमा असून पथका मार्फत वसुली केली जात आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागात दोन पथकाची नियुक्ती केली आहे. तर तालुकास्तरावर पथकाकडून वसुली केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.घरगुती ग्राहकाकडून वारंवार सांगून देखील वीजबिलाचा भरणा केला जात नाही अशा ग्राहकांचे मीटर डिस कनेक्ट केले जात आहे.परत वीजबिल भरल्यानंतर जोडणी करून दिल्या जाते.
दरम्यान, घरगुती ग्राहकांची संख्या ७० हजार८९५ असून त्यांच्याकडे २३कोटी २२ लाखाची थकबाकी आहे. तर सात हजार ७७ (वाणिज्य) कमर्शियल ग्राहक असून त्यांच्याकडे एक कोटी ३८लाख थकबाकी आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांची केवळ७७८ एवढी संख्या असून त्यांच्याकडे एक कोटी१२ लाख थकबाकी आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या ५३५ संस्थेकडे १५ कोटी५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकूण ७४ हजार ५८५ ग्राहकाकडे ४१ कोटी४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक अशी मिळून सुमारे २५ कोटी ७२ लाख रक्कम वसूल करणे बाकी आहे. तर दोन महिन्यात केवळ दोन कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
विजजोडणी केलेल्या ग्राहकाकडून विजबिलापोटी थकीत असलेली ४१ कोटी ४३ लाखाची मोठी बाकी असल्याने मार्च अखेर पर्यंत वसुली केली जाणार आहे. वसुली साठी महावितरण कडून सुरुवातीला ग्राहकांना थकीत असलेल्या विजबिलाचा भरणा करण्यासाठी आवाहन केले होते. तसेच ज्यांच्याकडे मोठी रक्कम थकीत आहे आशाना काळविले देखील होते. त्यानुसार पथकाच्या माध्यमातून देखील वसुली मोहीम ग्रामीण भागात जाऊन थकीत रक्कम भरून घेत आहेत. मुदत देऊन विजबिलाचा भरणा न केल्यास थेट मीटर तोडून घेत आहेत. त्यामुळे ग्राहकांना एन उन्हाळ्यात अंधाराचा व उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकाकडून लगेच वीज बिलाचा भरणा केल्यानंतर विजजोडणी सुरळीत केल्या जात आहे.