आटोळा जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

आटोळा जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


आटोळा : 
चाकूर तालुक्यातील आटोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडाप्पा गंगापुरे तर  प्रमुख पाहुणे म्हणून माणिकराव बडे, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जन कुमार लोणावळे, पंचायत समिती सदस्य महेश वत्ते  गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे सरपंच रेणुका तोडकरी,तंटामुक्तचे अध्यक्ष सचिन शेटे ,पोलिस पाटील गणेश फुलारी, चेअरमन अनवर बेग, मेघाताई काजळे, संतोष कलवले, हावगी तोडकरी, महादेव बोळेगावे, राहुल कांबळे, अविनाश पवार, अविनाश कसबे,  मुख्याध्यापक विलास कस्तुरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थाने प्रेक्षकांना विविध कलागुण सादर करून भारावून टाकले होते. सज्जनकुमार लोणावळे,महेश वत्ते व वंदना फुटाणे यांनी ही आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी बचत ,राष्ट्रीय एकात्मता , वासुदेव गीत, महिला सक्षमीकरण ,शेतकरी गीत,लोक गीते, कव्वाली,अशा विविध विषयांवर आधारित गाणी यावेळी सादर केली आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले. शिवलिंग कलवले, विश्वनाथ कलवले,  शिवशंकर रावळे , सत्यभामा तेलंगे,  मंदाकिनी दत्तात्रय भडके, डॉ माधव लोहारे , शिवाजी भडके, संग्राम शेळके ,जहीरोद्दीन मुजावर,बुरहान पठाण,  नारायण कांबळे, समीना मुंजेवार 
रत्नमाला फुलारी यांच्या सह सहशिक्षक प्रमोद हुडगे, विरभद्र बावगे, वसंत ढगे, सुभाष केंद्रे, संजीवकुमार गायकवाड, प्रमोद बिराजदार, गणपती केंद्रे, आनंद चव्हाण ,ज्योती बिराजदार आदिंनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी पालक, ग्रामस्थ, तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



फोटो:-  विविध कलागुण सादर करतात जि.प.प्रा.शाळा आटोळा शाळेचे विद्यार्थी.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा