हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

हिंगोली शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी


आठवडी बाजारात उडाली धांदल
-
हिंगोली -  शहर व परिसरात रविवारी (ता.1) सायंकाळी सात वाजता मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या या पावसाने शहरातील अकोला बायपास भागात सुरू असलेल्या आठवडी बाजारात खरेदी विक्रीसासाठी आलेल्या नागरीक व ग्राहकांची धादंल उडाली. रात्री उशीरापर्यत हा पाऊस शहरात सुरूच होता. 


हिंगोली शहरासह जिल्‍ह्‍यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या अकोला बायपास भागात पावसाचा जोर अधिक होता पंधरा ते वीस मिनीट झालेल्या या पावसाने येथे सुरू असलेल्या आठवडी बाजारात मोठी धादंल उडाली  अकोला बायपास भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो तो रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. आज झालेल्या अवकाळी पावसाने बाजारात धादंल उडाली होती. 


दरम्यान हा पाऊस शहरासह तालुक्‍यातील बळसोंड, पिंपरखेड, कारवाडी, खांबाळा तसेच कळमुनरी शहरात देखील पाऊस झाला. सध्या शेतशिवारात रब्‍बीतील हरभरा पिकाच्या काढणीची कामे काही ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्याची अवकाळी पावसाने गैरसोय झाली. शहरात पाऊस सुरू झाल्यावर अनेक भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता. त्‍यानंतर परत रात्री उशीरापर्यत मेघ गर्जनेसह पावसाची रिमझीम सुरूच होती.


या अस्मानी सुलतानी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे हजारो हेक्टरवरील नुकसान झाले आहे. गत वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळताच तोच पुन्हा यंदा अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आधीच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असताना पुन्हा  शेतकऱ्यांच्या नशिबी अस्मानी सुलतानी संकट कोसळले आहे. सरकार किती ही योजना राबविल्या तरीही शेतकऱ्यांच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य पसरले आहे.आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार तर्फे तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा