दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर एकजन गंभीर जखमी.

दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर एकजन गंभीर जखमी.


चाकूर तालुक्यातील जनावळ येथील अजय सुग्रीव शिंदे हा दुचाकीवरून लातूरकडे येत होता. दरम्यान, नांदगाव फाट्याजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची गाडी धडकली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे. जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाकूर जवळील जानवळ येथील अजय सुग्रीव शिंदे हा दुचाकीवरून लातूरकडे येत होता. दरम्यान, नांदगाव फाट्याजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची गाडी धडकली. यामध्ये अजयचा जागीच मृत्यू झाला, तर समोरच्या दुचाकीवरील शफीक खलील शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटना समजताच चाकूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रस्त्याची दुरवस्था त्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली असून २५ वर्षीय अजयला जीव गमवावा लागला आहे. रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी मृतदेह हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश