2560 रुपयाची अवैध देशी विदेशी दारु जप्त
2560 रुपयाची अवैध देशी विदेशी दारु जप्त
हिंगोली - बाळापूर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या म्हैसगव्हाण ते रुपूर टी पॉईटवर जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका पत्राच्या टिनशेडमध्ये अवैध देशी विदेशी दारुच्या 2560 रुपये किमंतीच्या बॉटल जप्त करून एकावर गुरूवारी (ता.12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या बोल्डा शिवारात म्हैसगव्हाण ते रुपूर टी पॉईटवर जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका पत्राच्या टिनशेडमध्ये एका नायलोनच्या थैलीत देशी व विदेशी दारुच्या एकूण 24 बॉटल ज्याची किमंत 2260 रुपये स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना चोरटी विक्री करताना गोविंद शिंदे राहणार हारवाडी यास पोलिसांनी पकडून त्याच्याकडून बॉटल जप्त करून पोलिस उपनिरिक्षक हनुमंत नकाते यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.