नांदेड येथील दोन युवकांचा शेततळयात बुडुन मृत्यू

नांदेड येथील दोन युवकांचा शेततळयात बुडुन मृत्यू


वसमत - धुळवंड साठी नांदेड़ येथून तालुक्यातील पार्डी बागल शिवारात आलेले युवक शेततळयात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली सदरील प्रकरणी उशीरा पर्यंत कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया चालु होती.


वसमत तालुक्यातील पार्डी बागल शिवारात नरवाडे यांच्या शेतात ता.१० मार्च मंगळवार रोजी दुपारी धुळवंड साजरी करण्यासाठी नांदेड येथील तरुण आले होते.मित्रा सोबत शेतातील शेततळयात पोहण्यासाठी अनिल उर्फ पिंकू बबन खरे  (२५ ) रा. खोब्रागड़े नगर नांदेड़ व अवघुत आबागोड कोतलवाड ( २४)  दोघे रा.पोर्णिमा नगर नांदेड हे गेले आसता पाण्याचा अंदाज न लागल्याने दोघेही पाण्यात बुडाले दोघांनाही पक्के पोहणे येत नव्हते. तेथे आसलेल्या युवकांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी इतरत्र माहीती दिली.वसमत येथील अग्णिशामक दलास पाचारण करण्यात आले होते.दोन तास पाण्यात शोध घेतल्या नंतर दोन्ही प्रेत सापडले. घटनास्थळी सपोनि सुनिल गोपिनवाड,बी.टी केंद्रे,यांच्या सह पोलीस कर्मचार्यांनी भैट देऊन पंचनामा केला. सदरील प्रकरणी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा