जिल्‍ह्‍यात 11 हजार 302 नागरिकांची तपासणी






















Villas Joshi




06:22 (1 hour ago)
 


 










to meumarathwada






 






जिल्‍ह्‍यात 11 हजार 302 नागरिकांची तपासणी

 

दहा नागरिक झाले होम क्‍वॉरंनटाईन 

 

 

हिंगोली -  जिल्‍ह्‍यात राज्यासह बाहेर राज्यातून आतापर्यत आलेल्या 11 हजार 302 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे मात्र त्यांना कोणताही आजार नसल्याचे स्‍पष्ट झाले आहे. 

 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये हिंगोली जिल्ह्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळुन येण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्याकरीता कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु नये,व  संशयित रुग्णामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवु नये, यासाठी बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम पातळीवर प्रत्येक गावनिहाय व्हीआरआरटी पथकाची स्थापना  करण्यात आली आहे. 

 

या व्हीआरआरटी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती, कृषी सहायक, पोलीस पाटील आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांचे सयुंक्त पथक स्थापन करुन त्यांच्यामार्फत गावामध्ये-गावाबाहेर गावावरुन आलेल्या किंवा येणाऱ्या प्रवाशांची पथकामार्फत नोंद घेण्यात येत असून, विहीत नमुन्यातील अर्ज भरुन कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्यामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.  जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या व्हीआरआरटी पथकामार्फत बाहेर गावावरुन आलेल्या एकुण 11 हजार 302 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून व तपासणी करण्यात आली आहे. 

 

यामध्ये ( ता. 15)  मार्च रोजी कळमनुरी तालूक्यात 21 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून व तपासणी करण्यात आली आहे. तर  (ता. 16)  मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 07, वसमत तालूक्यात 19, कळमनुरी तालूक्यात 149 आणि औंढा तालूक्यात 21, (ता.17) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 08, वसमत तालूक्यात 125, कळमनुरी तालूक्यात 137, सेनगाव तालूक्यात 09 आणि औंढा तालूक्यात 59, (ता. 18) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 26, वसमत तालूक्यात 135, कळमनुरी तालूक्यात 275, सेनगाव तालूक्यात 13 आणि औंढा तालूक्यात 89, (ता.19) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 02, वसमत तालूक्यात 174, कळमनुरी तालूक्यात 223, सेनगाव तालूक्यात 11 आणि औंढा तालूक्यात 149 यांचा समावेश आहे. 

 

(ता. 20)  मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 03, वसमत तालूक्यात 167, कळमनुरी तालूक्यात 404, सेनगाव तालूक्यात 282 आणि औंढा तालूक्यात 138, (ता. 21) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 51, वसमत तालूक्यात 356, कळमनुरी तालूक्यात 435, सेनगाव तालूक्यात 198 आणि औंढा तालूक्यात 215, (ता. 22) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 381, वसमत तालूक्यात 265, कळमनुरी तालूक्यात 612, सेनगाव तालूक्यात 296 आणि औंढा तालूक्यात 359, ( ता. 23) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 161, वसमत तालूक्यात 487, कळमनुरी तालूक्यात 450, सेनगाव तालूक्यात 363 आणि औंढा तालूक्यात 508 चा समावेश आहे. 

 

(ता. 24) मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 270, वसमत तालूक्यात 646, कळमनुरी तालूक्यात 477, सेनगाव तालूक्यात 289 आणि औंढा तालूक्यात 286 तर आज दि. 25 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 244, वसमत तालूक्यात 255, कळमनुरी तालूक्यात 348, सेनगाव तालूक्यात 383 आणि औंढा तालूक्यात 321 असे एकुण 11 हजार 302 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. 

 

तसेच जिल्ह्यात आलेल्या प्रवाशाना सर्दी, ताप, खोकला सदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य उपकेंद्राकडे कळवून तात्काळ उपकेंद्रात पाठविण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातून आलेल्यांचा शोध घेणे, तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस होम क्‍वॉरंनटाईन घरामध्येच विलगीकरण करण्यात करणे व प्रवाशी दररोज घराबाहेर पडणार नाही याची या पथकाकडून दक्षता घेण्यात येत आहे.

 





Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा