हिंगोलीत दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
हिंगोलीत दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
५३ परीक्षा केंद्रावर १८हजार विद्यार्थी देणार परीक्षा , शिक्षण विभाग सज्ज
हिंगोली - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र २०२० परीक्षेला मंगळवारी (ता.३) सुरुवात होत असून ,शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात ५३ परीक्षा केंद्रावर अठरा हजार २२७ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी.पावसे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद मार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२० ला मंगळवार पासून सुरुवात होत आहेत.या परीक्षा (ता.३) ते (ता.२३) या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.यासाठी परीक्षा विभागाने जय्यत तयारी सुरु केली असून, बारावीच्या धर्तीवर भरारी व बैठे पथकाची देखील स्थापना केली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीक्षा विभाग जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ धनवंत कुमार माळी, शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, डायट प्राचार्य, पुटवाड आदी अधिकारी काम पाहत आहेत.
मंगळवारी( ता.३) प्रथम भाषा मराठी,हिंदी, उर्दू विषयाचा पेपर सकाळी अकरा ते दोन यावेळेत तर दुपारी तीन ते सहा यावेळेत फ्रेंच विषयाचा पेपर आहे. बुधवारी चार मार्च रोजी सकाळी ११ते४ यावेळेत द्वितीय भाषा मराठी ,११ते१यावेळेत मराठी संयुक्त,शुक्रवारी (ता.६) सकाळी ११ ते २ यावेळेत हिंदी तर ११ ते १ यावेळेत हिंदी संयुक्त,शनिवारी (ता.७) सकाळी अकरा ते दोन तृतीय भाषा उर्दू, संस्कृत, पाली, अरेबिक, तर दुपारी तीन ते पाच यावेळेत तृतीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम, सोमवारी (ता.९)सकाळी अकरा ते दोन यावेळेत इंग्रजी भाषा ,शुक्रवारी सकाळी अकरा ते एक यावेळेत ( ता.१२) बीजगणित,शनिवारी (ता.१३) सकाळी अकरा ते एक यावेळेत भूमिती, तर सोमवारी( ता.१६) सकाळी अकरा ते एक विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर एक, बुधवारी( ता.१८) विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर दोन, तसेच गुरुवारी( ता.१९)रोजी सकाळी अकरा ते दोन यावेळेत मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स, तर शनिवारी (ता.२१) रोजी सकाळी अकरा ते एक यावेळेत इतिहास, राज्यशास्त्र,सोमवारी ( ता.२३) सकाळी अकरा ते एक यावेळेत भूगोल या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ५३ केंद्राची स्थापना करण्यात आली यामध्ये केंद्रनिहाय शाळांची यादी पुढील प्रमाणे आहे.एबीएम इंग्लिश स्कुल येथे २००विद्यार्थी, माणिक मेमोरियल आर्य हायस्कुल ४५०,शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय ४००,सरजूदेवी भारुका आर्य कन्या विद्यालय ३५०,खाकीबाबा मेमोरियल इंग्लिश हायस्कुल ३००, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कुल ३५०, अनुसया विद्यामंदिर खटकाळी ३५०, जीप कन्या शाळा ३००, विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कुल २२०, जिल्हा परिषद प्रशाला नरसी नामदेव ३३७, स्वामी विवेकानंद विद्यालय डिग्रस कऱ्हाळे २८९, चंदूलाल मुंदडा हायस्कुल सिरसम ३१५, नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ २९१,जिल्हा परिषद प्रशाला औंढा ३००,रामदास आठवले विद्यालय माथा औंढा,२७०, मधोमती विद्यालय लाख,४९१,जिल्हा परिषद हायस्कुल कन्हेरगाव नाका ३८४,जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा,२३७, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळाबाजार ४६६,जी.प.प्रशाला शिरड शहापूर ३६०,ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय साळणा १८३,जिल्हा परिषद हायस्कुल सेनगाव ४८७, महाकाली माध्यमिक हायस्कुल सेनगाव ३६५श्री संगमेश्वर ज्ञानमंदिर आश्रम शाळा पुसेगाव २४३, जिल्हा परिषद हायस्कुल पान कण्हेरगाव २४२,ज्ञानेश्वर विद्यालय वरुड चक्रपान ४२७,जी.प.प्रशाला गोरेगाव ४०६, रुख्मिणी माध्यमिक विद्यालय पळशी ३२१,अमृतराव पाटील जामठीकर केंद्रा बू.२२०,बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत ५५०,अहिल्या देवी होळकर कन्या विद्यालय वसमत३५०,महात्मा गांधी विद्यालय वसमत ३५०,जिल्हा परिषद हायस्कुल वसमत २५०,बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव ३६७,सिद्धेश्वर विद्यालय वसमत ३२२,शिवाजी माध्यमिक विद्यालय बाभळगाव १९०, चतुर्मुखी विनायक माध्यमिक विद्यालय असेगाव ३०८,चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय टेम्भुर्णी ३२८, गोरक्षनाथ विद्यालय आंबा चोंढी ४३३,तसेच निवासी हायस्कुल बाराशिव ३६८,नरहर कुरुंदकर विद्यालय कुरुंदा ५६४,जिल्हा परिषद हायस्कुल हयात नगर २४९, जिल्हा परिषद हायस्कुल हट्टा २४२,अशा पंधरा केंद्राचा समावेश आहे.
याचप्रमाणे कळमनुरी तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कुल कळमनुरी २५०,गुलाबनबी आझाद उर्दू हायस्कुल ५००,महात्मा फुले हायस्कुल ५३०, गोकुळ विद्यालय येहळेगाव गवळी ३७५,जीप माध्यमिक हायस्कुल आखाडा बाळापूर ३६२, राजर्षी शाहू विद्यालय आखाडा बाळापूर ३२५, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा जामगव्हाण ४५७,पोस्ट बेसिक आश्रमशाळा रामेश्वर तांडा३८८,वसंतराव नाईक आश्रमशाळा वारंगाफाटा ३१५,महात्मा फुले हायस्कुल कामठा फाटा ३००, असे दहा केंद्र आहेत. जिल्ह्यात ५३ परीक्षा केंद्रावर एकूण १८ हजार २२७ विद्यार्थी मंगळवारी परीक्षा देणार आहेत.