पुनर्वसन होईपर्यत जागेवर राहण्याची परवानगी द्या अतिक्रमण धारकांचे निवेदन

पुनर्वसन होईपर्यत जागेवर राहण्याची परवानगी द्या 

 

अतिक्रमण धारकांचे जिल्‍हाधिकाऱ्याकडे निवेदन 

 

हिंगोली -  येथील जलेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याच्या  नावाखाली शासनाकडून होणारी कडक कार्यवाही थांबवावी तसेच तिथे असलेल्या घरातील गोरगरीबांना पर्यायी व्यवस्‍था करून पुनर्वसन करून राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावी तोपर्यत आहे त्‍याच ठिकाणी राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी (ता.24) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

या बाबत नितीन चौधरी, जितेंद्र देवहंस, रमेश कुरील, ओम कुरील, अनिल कुरील, मल्‍लेश चुन्नमल्‍लु, शाम कुरील, भरत चौधरी आदींनी जिल्‍हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमुद केले आहे की, जलेश्वर तलावाच्या काठावर जवळपाच चाळीस वर्षापासून आम्‍ही वास्‍तव्यास आहोत तिथे असलेल्या घराची नळपट्टी, घरपट्टी, लाईटबील नियमत भरना करतो आमची मुलेबाळे याच घरात लहानाची मोठी झाली आहेत. जलेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली आमच्यावर शासनाने अडचणी आणले आहे. 

 

या प्रकाराकडे लक्ष द्यावे तसेच आमची राहण्याची दुसरी कोणतीच पर्यायी व्यवस्‍था केलेली नाही त्‍यामुळे ही व्यवस्‍था करून द्यावी त्‍यानंतरच या ठिकाणावरून उठवावे  शासनाने अचानक आम्‍हाला नोटीस दिली आहे. आमच्या राहण्याचा प्रश्न अगोदर सोडवावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा