यंदा ही कॉपी मुक्त अभियान राबविणार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


यंदा ही कॉपी मुक्त अभियान राबविणार

 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

हिंगोली - माध्यमिक व उच्य माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे मार्फत जिल्ह्यात मंगळवार (ता.१८) पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पाडल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

 

मागील सात वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात सुरुवात झाली. तेव्हापासून कॉपी मुक्त अभियान बारावी व दहावी परिक्षे दरम्यान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३३ केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी हे अभियान यंदा ही राबविण्याचा निर्णय झालेल्या दक्षता बैठकीत घेतला असल्याचे सांगून, भरारी व बैठे पथकाला देखील सूचना दिल्या आहेत. जर परिक्षे दरम्यान एखादा विद्यार्थी कॉपी करीत असेल तर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून रेस्टीकेट करण्याचे आदेश दिले आहेत. कॉपी मुक्त अभियानामुळे हुशार विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल आणि पुढे त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग साठी सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा