प्रहार जशक्तीचे पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन
प्रहार जशक्तीचे पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शुक्रवारपासून (ता.१४) राशनकार्ड संदर्भात बोंबाबोंब आंदोलन सुरू करण्यात आले आहे .
तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे ग्रांमपंचायत कार्यालय समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवारपासन विविध मागण्या संदर्भात सकाळी साडे दहा वाजता आंदोलन सुरू केले आहे. गावातील बऱ्याच लाभार्थीकडे राशनकार्ड नाहीत. ते देण्यात यावी. दाताडा बुद्रुक ते आजेगाव रस्त्याचे काम तीन वर्षापासून रखडलेले आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. गावा जवळच असलेल्या नाल्यावरील पुलाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे यासह विविध मागण्यासाठी गावकरी व प्रहारच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन सुरू आहे.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष ॲड. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली बालाजी गायकवाड, गोपाल पुरी, अशोक गवळी, श्री. कांबळे, भुजंग शिंदे, ज्ञानेश्वर शेटे, राजू अंभोरे, गजानन संगेकर, तानाजी साबळे, अनिल साबळे, राजीव साबळे, रवी साबळे आदींचा यात सहभाग आहे.
![]() | ReplyReply to allForward |