३३ केंद्रावर १३ हजार विद्यार्थी देणार आज बारावीची परीक्षा
३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार आज बारावीची परीक्षा
हिंगोली - शालांत माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.१८) जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रावर १३ हजार २५२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून परीक्षेची जय्यत तयारी शिक्षण विभागाने केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे यांनी दिली आहे.
माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने ता.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी अकरा ते दोन यावेळेत घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ३३ केंद्रावर १३ हजार २५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.यामध्ये हिंगोली आठ केंद्र, कळमनुरी पाच, वसमत दहा,औंढा पाच, तर सेनगाव पाच असे एकूण मिळून ३३ केंद्राचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे,उपशिक्षणाधिकारी मलदोडे, पळसकर, वडकुते, गटशिक्षणाधिकारी आदी परीक्षेची जोरदार तयारी केली आहे.परीक्षेसाठी ६७०पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. तर ३३ केंद्रसंचालक असे एकूण मिळून ७०३ कर्मचारी परीक्षेच्या केंद्रावर काम पाहणार आहेत.तसेच परिक्षे दरम्यान, काही गैर प्रकार होऊ नयेत यासाठी पाच भरारी तर तीन बैठे पथकाची स्थापना केली आहे.तसेच भरारी पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी,
प्राचार्य डायट,उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, आणि विशेष म्हणजे महिला भरारी पथकाचा देखील समावेश केला आहे. तर बैठे पथकात महसूल ,पंचायत विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांचा समावेश केला आहे.परीक्षा केंद्रावरील गैर प्रकार रोखण्यासाठी आणि कॉपी मुक्ती अभियान यशवी करण्यासाठी भरारी व बैठे पथकाकडून काम केले जाणार आहे. याशिवाय वेळोवेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी देखील परिक्षे च्या कालावधीत केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर नियंत्रण राहील.तसेच परीक्षा केंद्रावर गोंधळ, होऊ नये यासाठी पोलीस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.
पथकासोबत राहणार व्हिडीओ कॅमेरा
बारावीच्या परीक्षेदरम्यान पथकाला काही संशय येत असल्यास त्या केंद्रावर भरारी पथकाकडून केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद करणार तसेच पालकांकडून कॉपी वगैरे पुरविल्या जात असल्यास तेही दृश्य कैद केले जाणार आहे.