घरकुल बांधकामात हिंगोली जिल्हा परिषद विभागात दुसऱ्या क्रमांकावर

घरकुल बांधकामात हिंगोली जिल्हा परिषद विभागात दुसऱ्या क्रमांकावर


पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात तिसऱ्या स्थानी


हिंगोली - जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्‍ह्‍यात१६-१७ ते १९-२० घरकुल योजनेमध्ये शुक्रवार अखेर ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विभागातून दुसऱ्या क्रमांकावर घरकुल बांधकामात मजल मारली आहे. तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ७२ टक्के काम पूर्ण झाल्याने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे.


जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेची कामे केली जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्‍ह्‍याला सहा हजार ९७८  घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यानुसार शुक्रवार (ता.१४) अखेर पाच हजार०४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित एक हजार ९३३ घरकुलाचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये औंढा तालुक्‍यात २९४, वसमत तालुक्‍यात ४५४, हिंगोली २६०, कळमनुरी 
३४८, सेनगाव तालुक्‍यात ५८९ बांधकामे अपूर्ण आहेत.ज्याची टक्केवारी ७२एवढी आहे. तरी देखील पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत राज्यात हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.


याशिवाय रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्‍ह्‍याला पाच हजार ७६६ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यापैकी तीन हजार ६४६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून ज्याची टक्केवारी ६३ टक्के आहे.दोन हजार १२० घरकुले पूर्णत्‍वाच्‍या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये औंढा तालुक्‍यातील २७०, वसमत २९६, हिंगोली ४९४, कळमनुरी ४५४ तर सेनगाव तालुक्‍यातील ५६२ घरकुलांचा समावेश आहे.तसेच शबरी आवास योजनेमध्ये १६-१७ ते१९-२०यात दोन हजार ९८३  घरकुलांपैकी एक हजार ६३ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे.तर पारधी आवास योजनेमध्ये ३५ पैकी ३४  घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ज्याची टक्केवारी९७टक्के एवढी आहे.


 पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, पारधी घरकुल बांधकामासाठी जिल्ह्याला १५ हजार ७६२ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी १८ हजार लाभार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.त्यापैकी नऊ हजार ७८८ घरकुल पूर्ण झाले आहेत. घरकुलाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा परिषदेने विभागातून दुसरा क्रमांक पटकावला असून इतर जिल्ह्याच्या मनाने सरस कामगिरी बजावली आहे.


 जिल्‍ह्‍यात मध्यनंतरी घरकुल बांधकामासाठी रेती मिळत नसल्‍यामुळे लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाने  घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाभार्थ्यात समाधान व्यक्त होत होते.परंतु रेतीचे भाव गगनाला भिडल्याने लाभार्थ्यांना परवडणारे नसल्याने घरकुलची कामे संथगतीने सुरू आहेत.याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घालून परवडणाऱ्या दरामध्ये रेती उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्यातून पुढे येत आहे.




जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत घरकुलाची कामे युद्धपातळीवर सुरू असून उर्वरित घरकुलाची कामे लाभार्थ्यांनी वेळेवर पूर्ण केले तर दिलेले१००टक्के उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. आणि लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.


धनवंतकुमार माळी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा