तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस लोक अदालत बैठकीला गैरहजर राहणे भोवले
तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
लोक अदालत बैठकीला गैरहजर राहणे भोवले
हिंगोली - येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी( ता.८) लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. मात्र या महत्वाच्या बैठकीला गैर हजर राहिल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता.१०) तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी (ता.८) औरंगाबाद येथील उच्य न्यायालयाच्या वतीने भूसंपादनाचे मावेजा बाबतचे प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोड करून निकाली काढण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या. तसेच चार फेब्रुवारी रोजी मावेजा बाबत प्रकरणे निकाली काढण्याबाबत उपस्थित राहण्याबाबत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळविले देखील होते.मात्र या तिघांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये गैर हजर राहिल्याने प्रकरणे निकाली काढणे श्यक्य झाले नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे या तिघा कार्यकारी अभियंताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लोक अदालत मध्ये उपस्थित राहिला नाहीत म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस प्राप्त होताच आपले म्हणणे चोवीस तासाच्या आत सादर करण्याचे कळविले आहे.