वीर शहीद नायक सुरेश चित्ते अभिवादनानिमित्त उद्या कीर्तन
वीर शहीद नायक सुरेश चित्ते अभिवादनानिमित्त उद्या कीर्तन
आलमला / प्रतिनिधी
वीर शहीद नायक सुरेश चित्ते यांना अभिवादनानिमित्त उद्या बुधवारी (दि.१२) रात्री ९ वा. आलमला येथे हभप. नेहाताई भोसले महाराज जेजुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. हनुमान मंदिरासमोर गावचावडीत हे कीर्तन होणार असून यावेळी वीरमाता व वीरपत्नीचा सन्मान ग्रामस्थ व संयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कीर्तनात सर्वश्री हभप. सुरेश माळी हरंगुळ, गणेश सुतार लातूर, संजय लखशेटे गंगापूर व दत्ता निकम गंगापूर यांचे गायन, हभप शिवराम गुरूजी एकुर्गेकर यांचे हार्मोनियम तर हभप मृदंगभूषण ईश्वर गुरूजी किल्लारीकर यांचे मृदंगवादन तर हभप मोहन पाटील पेठसांगवीकर यांचे तबलासाथ राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष सचिन कापसे, भजनी मंडळ व आलमला ग्रामस्थांनी केले आहे.