झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
आठवले यांचा बांद्रा येथील मोर्चात सरकार ला इशारा

राज्यभर रिपाइं चे भूमीमुक्ती  आंदोलन

 केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
 भेटणार

 मुंबई दि. 20 -  झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी ;झोपडिवासीयांच्या न्याय हक्कासाठी आरपीआय संघर्ष करीत राहील.  सन 2014 पर्यंत च्या झोपड्यांना अधिकृत करण्यात यावे. कोणत्याही प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांचे आधी पुनर्वसन केल्या शिवाय गरिबांच्या झोपड्यांना हात लावाल तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बांद्रा येथे मुंबई उपनगर  जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजित झोपडपट्टीवासीयांच्या मोर्चात राज्य सरकारला दिला.
 "आमची फिरत नाही खोपडी म्हणून तुटते आमची झोपडी जर फिरली आमची खोपडी तर तुटू देणार नाही आमची झोपडी अशी कविता सादर करीत झोपडीवासीयांनी आपल्या निवाऱ्याच्या हक्कासाठी राज्य सरकार विरुद्ध  आक्रमक  संघर्षशील होण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकार च्या रेल्वे;बीपीटी; संरक्षण मंत्रालय आदी जमिनींवरील झोपड्यांच्या  पुनर्वसनासाठी या जमिनी केंद्र सरकार कडून राज्य सरकार ने खरेदी करून त्या जमिनींवर एस आर ए योजना राबवून तेथिल झोपडीवासीयांचे पुनर्वसन केले पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे ना.. रामदास आठवले म्हणाले.

राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयांवर रिपाइं ( आठवले) यांच्या वतीने भूमीमुक्ती आंदोलन करण्यात आले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा