गांधी चौकात मोकाट जनावरांचा संचार अपघाताचे प्रमाण वाढले, पालिकेचे साफ दुर्लक्ष





गांधी चौकात मोकाट जनावरांचा संचार

अपघाताचे प्रमाण वाढले, पालिकेचे साफ दुर्लक्ष

 

हिंगोली -शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गांधी चौकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने अपघातात वाढ होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कडे मात्र पालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील जनावरे हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 

शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यावर यामध्ये गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका, बसस्थानक, जवाहर रोड रिसाला बाजार,आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा कळप ठिय्या धरून बसत आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

 

 यापूर्वी मागील वर्षी मोठा गाजावाजा करून पालिकेने मोकाट जनावरांना पकडून कोंड वाड्यात टाकण्यासाठी भल्या पहाटे मोहीम राबविली होती. काही जनावारांच्या पशुमालकाकडून दंड वसूल करण्यात आला होता. जेमतेम आठ दिवस चाललेली मोहीम पालिकेने गुंडाळून टाकल्याने पुन्हा मोकाट जनावरांचा मुक्त वावर शहरातील मुख्य ठिकाणी वाढल्याने नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.




 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा