महिलेची गळफास लावून आत्‍महत्या

महिलेची गळफास लावून आत्‍महत्या गळफास लावून आत्‍महत्या

वसमत - तालुक्‍यातील बाभुळगाव येथील एका अल्‍पभुधारक महिलेने नापीकीला कंटाळून मंगळवारी (ता.18) सकाळी पाचच्या सुमारास गळफास घेवून आत्‍महत्या केल्याची घटना घडली. 

 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्‍यातील बाभुळगाव येथील द्रौपदाबाई गोपीनाथ मगर (वय 40) या अल्‍पभुधारक शेतकरी होत्या तसेच त्‍या दिव्यांग होत्या त्याच्याकडे साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. यांच्यावर त्‍याच्या कुटूंबीयाचा उदरनिर्वाह होत होता. सततच्या नापीकीमुळे संसारात अडचणी येत आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी व पुढे होणाऱ्या लग्नसाठी लागणारा खर्च कसा करावा या विवंचनेत त्या सापडल्या होत्या. दरम्‍यान, मंगळवार सकाळी पाचच्या सुमारास त्‍यांनी स्‍वतःच्या घरी गळफास घेवून आत्‍महत्या केली. या बाबत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा