<no title>
अवैद्य देशी-विदेशी दारू अड्यावर पोलिसांचा छापा
४७३२८ रूपयेचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
"'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'"""""""""""""'"""""
अहमदपूर ( बालाजी काळे )
सविस्तर माहीती अशी की, शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूरच्या पाठीमागील गल्लीत सलीम चाँद सय्यद रा. फत्तेपुरा ता. अहमदपूर येथील इसम अवैद्य देशी-विदेशी दारू विक्रि करत असलेली माहीती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीसांना मिळाली असता पोलीस निरिक्षक सुनिल कुमार पुजारी यांच्या मार्गदशाखाली सहा.पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोउप-निरीक्षक एकनाथ डक, पोहेकॉ बबन टारपे, पोना रामकिशन गुट्टे, पोकॉ जुल्फकार लष्करे, पोकॉ खंडू लोंढे, चालक बेंबडे आदीच्या पथकाने दि १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०८:३० वाजता अचानक छापा टाकला असता सदरील अवैद्य देशी-विदेशी दारू विक्री करणारा नमुद इसम पोलीसांची चाहुल लागताच विक्रिस आणलेला दारूचा साठा तेथेच सोडून पळून गेला असुन त्या ठिकाणी आढळून आलेल्या इंपीरीअल ब्लु व्हिस्की १८० मिलीच्या १४४ बाटल्या, मॅकडॉल नं वन व्हिस्की १८० मिलीच्या ४८ बाटल्या, देशी दारू भिंगरी संत्रा १८० मिलीच्या ८४ बाटल्या असा एकूण ४७३२८ रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकॉ बबन टारपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील फरार आरोपीविरुद्ध अहमदपूर पोलीसांत कलम ६५ अ.ई महा.दारूबंदी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना रामकिशन गुट्टे हे करीत आहेत.