हॉलीबाल ,कबड्डी स्पर्धेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
हॉलीबाल ,कबड्डी स्पर्धेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली -येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी हॉलिबाल, कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे,समाजकल्यान सभापती फकिरा मुंडे, महिला बालकल्याण सभापती रुपाली ताई पाटील गोरेगावकर, जीप सदस्य संजय देशमुख,बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल,डॉ.सतीश पाचपुते, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे,सीईओ डॉ. एच. पी. तुमोड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे ,डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ,लेखा वित्त अधिकारी दे. का. हिवाळे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.