शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
हिंगोली - जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी कळमनुरी येथील गटविकास अधिकारी चर्चा करीत असताना सीईओ यांच्या दालनात येऊन तू लई हरामखोर आहेस असे म्हणून विनाकारण शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याची घटना बुधवारी साडे पाचच्या सुमारास घडली. त्यानंतर गुरुवारी हिंगोली शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी हे बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात चर्चा करीत असताना तेवढ्यात भाटेगाव येथील उपसरपंच शंकर आडे हे काही काम नसताना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात येऊन बीडीओ खिल्लारी यांना तू हरामखोर आहेस म्हणून विनाकारण शिवीगाळ केली. आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुरुवारी मनोहर खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेख सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.