पालिकेची प्लास्टिकबंदी मोहीम  २१५किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त,एक लाखाचा दंड वसूल





पालिकेची प्लास्टिकबंदी मोहीम 

 

 

प्लास्टिक 215 किलो जप्त,

एक लाखाचा दंड वसूल

 

हिंगोली - येथील पालिकेतर्फे शहरात शुक्रवारी  प्लॉस्‍टीक बंदी बाबत धडक मोहिम राबवत मुख्य बाजारपेठेतील साठ दुकानाची तपासणी करून २१५ किलोग्रॅम (दिड टिप्‍पर भरून) ऐवढे प्लॉस्‍टीक जप्त करून १ लाख १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. 

 

 हिंगोली पालिके तर्फे महाराष्‍ट्र प्लॉस्‍टीक व थर्माकॉल अविघटनाशील वस्‍तूचे अधिसुचना २०१८ अन्वये बंदी घालण्यात आलेल्या प्लॉस्‍टीक साहित्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बाबत वारंवार शहरातील व्यापारी, नागरीक, विविध आस्‍थापणा यांना वेळोवेळी अवगत करण्यात आलेले आहे. परंतू त्‍यानंतरही शहरातील काही व्यापारी बंदी घालण्यात आलेल्या प्लॉस्‍टीक साहित्याचा सर्रासपणे वापर, साठवणूक, विक्री, वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पथकामार्फत मुख्य बाजारपेठेत अचानक धाड टाकून जवळपास पन्नास ते साठ एवढ्या दुकानाची तपासणी केली. 

 

सदर तपासणीत एकूण २३ दुकानदाराकडे बंदी घालण्यात आलेले अंदाजे २१५ किलोग्रॅम (दिड टिप्पर भरून) एवढा प्लॉस्‍टीक साठा आढळून आल्याने प्लॉस्‍टीक साहित्य जप्त करून संबधित दुकानदाराकडून प्रथम गुन्हापोटी प्रत्‍येकी पाच हजार प्रमाणे एक लाख पंधरा हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. अशा प्रकारे कार्यवाही टाळण्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी पर्यावरण घातक अशा बंदी घालण्यात आलेल्या प्लॉस्‍टीक साहित्याची साठवण, विक्री, खरेदी वापर न करण्या बाबत नगरपरिषदेतर्फें आवाहन करण्यात आले आहे. 

 

परंतू यानूसार शहरातील व्यापाऱ्यामार्फत अनुपालन होत नसल्याने दोषी आढळून आलेल्या व्यक्‍तीविरुध्द अधिसुचने प्रमाणे दंडात्‍मक तथा फौजदारी गुन्हा नोंद करण्याच्या कार्यवाही नगरपरिषद कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषदेतर्फे देण्यात आला आहे. तसेच शहरातील व्यापारी, नागरीक सर्व आस्‍थापना यांनी (ता.१) मे पुर्वी शहरातील प्लॉस्‍टीक मुक्‍त होण्याच्या अनुषंगाने सिंगल युज प्लॉस्‍टीकचा वापर न करता पालिका प्रशासनास सहकार्य करावे  असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

दरम्‍यान, शुक्रवारी झालेल्या या धडक कार्यवाहीत नगपरिषदेचे उपमुख्याधिकारी  उमेश हेंबाडे, शाम माळवटकर, प्रशासकिय अधिकारी सनोबर तसनीम, स्‍वच्‍छता अभियंता बाळू बांगर, मुंजाजी बांगर, स्‍वच्‍छता निरिक्षक किशोर काकडे, रचना सहाय्यक रविराज दरक, स्‍थापत्य अभियंता कपील धुळे, संगणक अभियंता मयुर शिवशेटे, रचना सहाय्यक डी. पी.शिंदे यांच्यासह अशोक गवळे, पंडीत मस्‍के, प्रवीण चव्हाण, गजानन बांगर, ललिता खंदारे, नागेश नरवाडे, नितीन पहिनकर, दिनेश वर्मा, सविता घनसांवत, अमरसिंग ठाकूर आदीचा समावेश होता.


 

 


 


 















ReplyReply to allForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा