तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज

तुला खतम करतो म्हणत पतीने पेटविले पत्नीला; रुग्णालयात मृत्यूशी झुंज

 

 

हिंगोली- दिवसेंदिवस महिलांना पेटविण्याच्या घटनात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत कांडाच्या घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र सून झाला असताना अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली, यात  घरातील किरकोळ वादातुन पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ७८ टक्के भाजली असून, तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

 

संगीता (२६) असे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेच नाव आहे. संगीताचे माहेर हे गुगुळ पिंपरी असून, आठ वर्षांपूर्वी शंकर यांच्या सोबत विवाह झाला होता, या दाम्पत्याना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. सुरुवातीला सुरळीत चालनाऱ्या  संसाराला कुणाची तरी नजर लागली अन मागील काही दिवसापासून किरकोळ वादावरून घरात वादंग उठत गेले हे वादंग एवढे वाढत गेले की,  चक्क  पत्नी घरात एकटी पाहून नवऱ्याने घरात धाव घेतली हातात रॉकेलची कॅन घेऊन पत्नीच्या अंगावर भडाभडा ओतली. अन पेटून ही दिले. पेटलेल्या पत्नीने जीव वाचविण्यासाठी आरडा ओरड करीत धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तात्काळ उपचारासाठी वाशीम येथील रुग्णालयात दाखल केले असता, ७८ टक्के महिला भाजली गेल्याने महिलेला पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पती शंकर , सासू कमलाबाई  या मायलेकरा विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर महिला ही मृत्यूशी झुंज देत आहे. वारंवार घडत असलेल्या या अशा घटनाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे तर महिला वर्गामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा