अतिक्रमण भागातील तालुका भूमी अभिलेखकडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन
अतिक्रमण भागातील तालुका भूमी अभिलेखकडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन
हिंगोली - शहरातील जलेश्वर तलावासमोरील अतिक्रमण भागातील शनिवारी (ता.१५) तालुका भूमी अभिलेख कार्यलया कडून पोलीस बंदोबस्तात रेखांकन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होऊन एकत्र जमले होते.
शहरातील जलेश्वर तलाव काठावर गेली चाळीस वर्षांपासून १९५नागरिकांनी अतिक्रमण करून कच्ची व पक्की घरे बांधली.त्यामुळे जलेश्वर तलावातील पाणी दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. शिवाय पाच महिण्यापूर्वी तलावातील मास्यांचा देखील तडफडून मृत्यू झल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तसेच मंदिरात ही घाण पाणी गाभाऱ्यात जात होते.
जलेश्वर तलाव काठावरची जागा ही महसूल विभागाची असल्याने काठावर अतिक्रमण करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून आदेश आल्यानंतर अतिक्रमण काढावे लागणार आहे. त्यामुळे शनिवारी भूमी अभिलेख कार्यालयाकडुन रेखांकन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी पैंजणे, तहसीलदार मधुकर खंडागळे, कार्यकारी दंडाधिकारी वडवळकर,पोटे, बेले, इंगोले, गवई यांच्यासह पोलिसांचा फोजफाटा तैनात केला होता.
अतिक्रमण धारकांना आता २१ फेब्रुवारी अखेर अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र अतिक्रमण धारकांना बेघर केल्यास रस्त्यावर येतील त्यासाठी त्यांनी आज नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु जवळपास शासनाची जागा नसल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता अतिक्रमण धारकांना जावे तरी कुठे असा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण धारकासाठी आमदार तानाजी मुटकुळे, संतोष बांगर यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यास अतिक्रमण हटविण्यावर स्थगिती आणल्यास अतिक्रमण धारकांना दिलासा मिळणार आहे. मात्र यासाठी आमदारांनी इच्छा शक्ती वापरल्यास काही होऊ शकते.
आझाद मैदानावर आंदोलन छेडणार
आझाद मैदानावर आंदोलन छेडणार
जलेश्वर तलाव काठावरील अतिक्रमण हटविल्यास ,शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अतिक्रमण धारकाकडून आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.