लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत कर्मचारी मेळावा
लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत कर्मचारी मेळावा
लिंगायत आयडॉल राज्य पुरस्काराचे वितरण
लातूर ः लिंगायत महासंघ महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष व महात्मा बसवेश्वर चित्रपटाचे निर्माते प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 29 मार्च 2020 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे लिंगायत कर्मचारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायत समाजातील सर्व वरिष्ठ पातळीपासून चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांपर्यंत, शाळा, महाविद्यालय, कारखान्यातील कामगार, असंघटीत कर्मचारी, कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कर्मचार्यांची नोंदी येथे केल्या जाणार आहेत. समाजाच्या विविध प्रश्नांवर कर्मचार्यांमध्ये जागृती व त्यांचे मार्गदर्शन घेण्यापासून ते त्यांचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढवावा म्हणून हा लिंगायत कर्मचारी मेळावा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष तथा महात्मा बसवेश्वर चित्रपटाचे निर्माते प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या मेळाव्यासाठी लिंगायत समाजातील अनेक वरिष्ठ अधिकारी, धर्मगुरू व काही होतकरू अधिकारी यांची उपस्थिती लाभणार असून या मेळाव्यात समाजातील, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक व अन्य पैकी काहींना लिंगायत आयडॉल महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
तरी प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचार्यांनी लिंगायत महासंघाशी संपर्क करून नाव नोंदणी ठरावी. त्यासाठी 9890099792 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी कळवले आहे.