जिल्हा परिषदेतील महिला कक्ष कुलूपबंदच! वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

 








हिंगोली - जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील महिला कक्षाला कुलूप ठोकल्याने कार्यालयातील व कामकाजनिमित्य येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुन्हा महिला कक्ष सुरु करण्याची मागणी होत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.

 

 

येथील जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या पुढाकारातून कार्यालयातील महिला कर्मचारी,कामानिमित्य येणाऱ्या महिलांच्या लहान बाळाला स्तनपान करण्यासाठी मागील तीन वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांच्या प्रयत्नातून शेष फंडातून या महिला कक्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या कक्षाचा उपयोग गरोदर माता, किंवा स्तनदा मातांना होत नसून,मध्यन्तरी केवळ जेवण करण्यासाठी या कक्षाचा वापर कर्मचारी वर्गातून केला जात होता. परंतु काही वर्षांपासून हा कक्ष कुलूप बंद अवस्थेत धूळखात पडला असून, या कडे संबंधित विभागाचे तरी सोडा वरिष्ठ अधिकारी यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याने या महिला कक्ष कशासाठी स्थापन केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कक्षा समोर कचऱ्याचे ढिगारे पडल्याने पुन्हा जिल्हा परिषदेच्या स्वछता मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. हा कक्ष पुन्हा पूर्ववत सुरु होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी कामानिमित्त येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यातून होत आहे.


 

 



 



Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा