*उदगीर तालुका पत्रकार संघाचे १५ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण.*
*उदगीर तालुका पत्रकार संघाचे १५ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण.*
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार वितरण.
उदगीर : उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून दिले जाणारे पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे व कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून मराठवाडास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागून तज्ञ परीक्षक मंडळाचे मार्फत स्पर्धकांची निवड करण्यात येते सन २०१८ व २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ११ वाजता संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री संजय बनसोडे, कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन, वफ्त बोर्डाचे मंत्री आमदार प्रभू चव्हाण, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर (मुन्ना) पाटील राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून किसिन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.विजयकुमार पाटील ,मुबंई बिट्सचे डायरेक्टर अर्जून मुद्दा यांची उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातील विजेत्यांना प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास उदगीर शहर व परिसरातील पत्रकार बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे सचिव दयानंद बिरादार यांनी केले आहे.