कळमनुरीत गॅस सिलेंडरवर अंत्यसंस्कार
भाववाढ झाल्याचा नागरिकांतून संताप
कळमनुरी-
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत महिलांना योगदान म्हणून गॅस मोफत दिला .परंतु आता सिलेंडरचे भाव वाढल्याने नागरिकांनी दर वाढीचा संताप व्यक्त करीत ग्यास सिलेंडरवर अंत्यसंस्कार करून टाकी कचरा कुंडीत फेकून शासनाचा जाहीर निषेध केला.
केंद्र सरकारने घरगुती,व्यवसायिक ग्यास सिलेंडर मध्ये दर वाढ केल्याने आता तीच टाकी किमान आठशे ते नऊसे रुपयांच्या घरात जात आहे. त्यामुळे सामान्य, आणि गोरगरीब नागरिकां परवडणारे नाही. शासनाने सामान्य नागरिकांची दिशाभूल केली असून कळमनुरी मध्ये सिलेंडरची पूजा करून टाकीचा अंत्यविधी काढून कचरा कुंडीत फेकुन निषेध केला.
यावेळी अजीस खा पठाण,राजू कांबळे,शेख अफझल,शोएब लाला,जाबेर ,शेख,
सोहेल,आसेफ नाईक,संज्जू पठाण, आदी नागरिक उपस्थित होते.