हिंगणी येथे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा
हिंगणी येथे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा
हिंगोली - तालुक्यातील हिंगणी येथे बौध्द विहारात भिम गीते का लावता या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुरूवारी (ता.१३) गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथे रविवारी (ता.९) रात्रीच्या वेळी बौध्द विहारात भिम गीते का लावता या कारणावरून वाद करून भिमगीते बंद करून आश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी व चापटाने मारहाण करून विनयभंग केल्याची फिर्याद अनिता सरतापे यांनी केली असून त्यांच्या फिर्यादीवरून हरिहर घुगे, प्रकाश घुगे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली शहर हे करीत आहेत.
जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
हिंगोली - तालुक्यातील हिंगणी येथील एका दुसऱ्या घटनेत गुरूवारी (ता.१३) दुपारी संतोष घुगे यांच्या आखाड्यावर संतोष घुगे, बाळू घुगे यांनी प्रकाश हनवते याला संगमत करून पुर्वी बौध्द विहारात झालेल्या वादावरून चिडून दगडाने डोक्यावर मारून मुका मार दिला व ब्लेडने डाव्या मनगटावर मारून जख्मी केले जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली शहर पोलीस करीत आहेत.