संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.13:- राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 सकाळी 9 वाजता लातूरहून उदगीरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह उदगीर येथे राखीव. दुपारी 12.41 वाजता श्री. भास्कर रंगराव पाटील, रा. तिवटग्याळ यांच्या मुलाच्या लग्न सोहळयास उपस्थिती. स्थळ:- तिवटग्याळ, ता.उदगीर. दुपारी 1.10 वाजता श्री.बसवंतराव बिराजदार (तपसाळे) रा.तोंडार यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- माहेश्वरी मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर. मतदार संघातील विविध कार्यक्रमास उपस्थिती/ भेट, शासकीय विश्रामगृह, उदगीर येथे राखीव, व सोयीनुसार उदगीरहून लातूरकडे प्रयाण, लातूर येथे आगमन व मुक्काम.
शनीवार दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता लातूरहून उदगीरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता उदगीर तालुका पत्रकार संघ- पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा 2020 उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ:- शिवाजी महाविद्यालय सभागृह ,उदगीर. दुपारी 12 वाजता श्री. संत सेवालाल महाराज जयंती सोहळा उपस्थिती. स्थळ:- सेवागड चौक, बोरतळा पाटी, देगलूर रोड, उदगीर. दुपारी 2 वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, शाखा उदगीर-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाचे पुजन व ध्वजावंदन, प्रेरणा संदेश, जाहीर सभा स्थळ:- छात्रपती शिवाजी महाराज चौकाचे बाजूचे मैदान. सायंकाळी 6.30 वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, सप्ताह उद्घाटन स्थळ:- नगरपरिषद समोरील मैदान ,उदगीर. रात्री 8 वाजता डॉ. शाहबाज दुराणी यांच्या डेंन्टल हॉस्पिटलचे उद्घाटन स्थळ :- चौबारा रोड, उदगीर. सोयीनुसार उदगीरहून लातूरकडे प्रयाण. लातूर येथे आगमन व राखीव.
रविवार दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता लातूरहून उदगीरकडे प्रयाण. सकाळी 10.35 वाजता शेख अब्दूल रशिद वल्द शेख मस्तान साहब यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- ग्रँड फॅक्शन हॉल ,जळकोट रोड, उदगीर. सकाळी 11.5 श्री. गोपीनाथ मारुतीराव यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- ओमकार फॅक्शन हॉल, डॅम रोड, उदगीर. सकाळी 11.30 वाजता श्री.रमेश भगवंतराव जाधव यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ:- जि.प. शाळा, जगळपूर, ता. जळकोट. सायंकाळी 6 वाजता देवणी कला -क्रीडा महोत्सव 2020, उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ:- जिल्हा परिषद प्रशाला, देवणी. सोयीनुसार लातूरकडे प्रयाण.लातूर येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह लातूर येथे राखीव. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉग्रेसच्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन-प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती. स्थळ:- गिरवलकर सभागृह, गिरवलकर नगर, बार्शी रोड, लातूर. दुपारी 3.30 वाजता लातूर येथून चाकूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता अहमदपूर व चाकूर तालुका काँग्रेंस कमिटीच्या वतीने महाविकास आघाडीच्या मंत्री महोदयांचा व आमदार महोदयांचा भव्य सत्कार –सोहळयास उपस्थिती. स्थळ:- चाकूर सोयीनुसार लातूरकडे प्रयाण.रात्री 10.30 वाजता रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.