जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा
आज क्रिकेट, कब्बडी, हॉलीबॉल संघात अंतीम लढत
जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा
हिंगोली - येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत यात क्रिकेट मध्ये पंचायत समिती हिंगोली व कळमनुरीत अंतीम लढत होणार कब्बडीत पंचायत समिती कळमुनरी व सेनगाव यांच्या तर हॉलीबॉलमध्ये वसमत व औंढा पंचायत समितीच्या संघात अंतीम लढत होणार आहे. हे संघ गुरवारी झालेल्या स्पर्धेत उपविजेते ठरले आहेत.
महसुल विभागाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतर्फे अधिकारी. पदाधीकारी व कर्मचाऱ्यासाठी तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजन गुरूवारपासून करण्यात आले आहे. गुरूवार घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत हिंगोली पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालय यांच्यात सामना झाला यात हिंगोली पंचायत समितीने मुख्यालयाचा पराभव करीत अंतीम फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या एका सामन्यात सेनगाव व औंढा या संघात सामना झाला यात औंढ्याच संघ विजेता ठरता आता अंतीम सामना हिंगोली व औंढा पंचायत समिती यांच्यात रंगणार आहे.
कब्बडी स्पर्धेत पंचायत समिती कळमनुरी व हिंगोली यांच्यात सामना झाला यात कळमनुरी संघाने बाजी मारली दुसऱ्या एका सामान्यात औंढा व सेनगाव पंचायत समिती यांच्या लढत झाली यात सेनगाव संघ विजेता ठरता आता अंतीम लढत कळमनुरी व सेनगाव यांच्यात होणार आहे.
तसेच हॉलीबॉलमध्ये पंचायत समिती वसमत व मुख्यालयात सामना झाला यात वसमतचा संघ विजेता ठरला आहे तर दुसऱ्या एका सामान्यात औंढा व सेनगाव यांच्यात सामना झाला यात औंढा पंचायत समितीचा संघ विजेता ठरला यात अंतीम लढत वसमत व औंढ्याच्या संघात होणार आहे.
आज विविध स्पर्धेचे आयोजन
येथील संत नामदेव कवायत मैदानावर सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यात शुक्रवारी (ता.21) थ्रोबॉल, संगीत खुर्ची, रस्सीखेच, शंभर व दोनशे मिटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर विविध स्पर्धेचे अंतीम सामाने होणार आहेत. यासह महिला व पुरुषांच्या बॅटमिटन स्पर्धा होणार आहेत. गितगायन, समुहगायन, एकपात्री नाटक, लघु नाटीका व सांस्कृतीक स्पर्धा होणार आहेत.