चिखली येथे शेतकऱ्याची आत्महत्या
कळमनुरी - तालुक्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याने नापीकीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१९) घडली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिखली येथील गणेश रामराव चव्हाण (वय36) यांनी बुधवारी सकाळी स्वतःच्या राहत्या घरी तीन वर्षापासून शेतात नापिकी होत असल्याने व यावेळी शेतातील सोयाबीन पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतातील नापीकीला कंटाळून कोणासही न बोलता तेव्हापासून ताण तणावात राहून त्याचे राहते घरात नायलोनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत राजकुमार चव्हाण यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आमस्मात मृत्युची नोंद बुधवारी झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.