सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव करावेत

सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव करावेत


लातूर,दि.20:- जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर च्या कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 योजनांचे मुल्यमापन सनियंत्रण व डाटा एंट्री करणे या योजनेअंतर्गत 2 लिपीक कम डाटा एंट्री ऑपरेटर ची आवश्यकता असून सदर कामगार 11 महिण्याच्या कालावधी करीता दरमहा 9600/- मानधनावर सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांमार्फत पुरवठा करावयाचे आहेत.


तरी सदर मनुष्यबळ पुरविणे कामी सक्षम असलेल्या कामाच्या अटी व शर्ती इत्यादी ची पुर्तता करु शकणाऱ्या इच्छूक /पात्र सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थानी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र,क्रीडा संकूल, औसा रोड,लातूर यांच्याकडे दिनांक 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सायंकाळी 05.45) पर्यंत सादर करावे.


त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच कामाच्या अटी व शर्ती इत्यादी चा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केद्र, क्रीडा संकूल, औसा रोड, लातूर यांच्या सुचना फलकावर पहावयास उपलब्ध्‍ आहे, असे सदस्य सचिव कामवाटप समिती तथा प्र. सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा