स्त्री भ्रूणहत्या वर आधारित नाटिकेचे सादरीकरण
स्त्री भ्रूणहत्या वर आधारित नाटिकेचे सादरीकरण
हिंगोली - जिल्हा परिषदेच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे तीन दिवसीय आयोजन केले होते. शुक्रवारी औंढा येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूण हत्येवर आधारित माझं अस्तित्व या नाटिकेचे सादरीकरण केले असता ,उपस्थितांचे लक्ष वेधले.
जिल्हा परिषदेच्या वतीने महसूल विभागाच्या धर्तीवर तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार संत नामदेव कवायत मैदानावर क्रिकेट, हॉलिबाल, यासह थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, धावणे अश्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा घेण्यात आल्या तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यात सामूहिक गायन, वैयक्तीक गायन, एकपात्री नाटिका, सामूहिक नाटिका अशा स्पर्धा झाल्या. यामध्ये औंढा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोहरा व पिंपळदरी पप्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांनी दिग्दर्शक डॉ. अविनाश गायकवाड , ज्योती बांगर लिखित स्त्री भ्रूण हत्या,माझं अस्तित्व या नाटिकेचे पीसीपी एनडीटी कायदा१९९६ यावर आधारित जबरदस्त नाटिकेचे सादरीकरण केले आहे.यामध्ये कलाकार म्हणून ज्योती बांगर, सोनल प्रधान,सरिता मस्के, विपलवी डावरे, सुजाता लवटे,माया खैरे, संजीवनी देवकते, हरीचंद्र गोलाईतकर हे सहभागी झाले होते.
वंशाला दिवा हवा पाहिजे म्हणून काहींनी गर्भनिदान करून मुलीचा जन्म होऊ देत नाहीत त्यामुळे भारतात दर हजारी पुरुषाच्या मागे स्त्रियांचे प्रमाण वीस ने कमी झाले आहे. एक हजारमागे ९८० असा रेशो आहे. त्यामुळे मुलगा असो मुलगी गर्भनिदान न करता बाळाला जन्म दिला पाहिजे, या नाटिकेद्वारे जबरदस्त सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी डॉ. शिवाजी पवार ही नाटिका पाहून या पथकामार्फत जिल्हाभरात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.