राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचा सत्कार
हफिज मित्र मंडळाच्या वतीने लाडूतुला
वसमत - वसमतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवार (ता.१४) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार चंद्रकांत नवघरे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार , अ.हफिज अ. रहेमान, ग्रामिण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके , पुर्णा ग्लोबलचे अध्यक्ष विनोद झंवर यांची उपस्थिती होती.
सन २०१०-२०१३ या कालावधीत वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणुन सर्जेराव पाटील कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात पाटील यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावा यासाठी नागरीक वा पोलीस यांचा समन्वय घडवून आणला. तसेच गणेश उत्सवासह विविध धार्मिक उत्सव शांततेत पार पडावे यासाठी सर्व समाजामध्ये एकोपा घडवून आणला. विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामुळे वसमतकरांना सर्जेराव पाटील यांनी लावून दिलेली शिस्त , प्रेम हे कायम आहे.
नुकताच पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले. त्या पार्श्वभूमीवर वसमतकरांच्या वतीने त्याचा सत्कार सोहळा व्हावा अशी पोलीस कर्मचारी व नागरीकांची ईच्छा होती. त्यानुसार श्री पाटील शुक्रवार ता.१४ वसमत येथे आले असता त्यांचा विविध क्षेत्रातील नागरीक, व्यापारी, पोलीस पाटील, अधिकारी, राजकीय मंडळी, पत्रकार यांनी यथोच्च सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन यलाप्पा मिटकर यांनी केले तर आभार ताम्रध्वज कासले यांनी मानले. तत्पुर्वी काँग्रेसचे प्रदेश सचिव आ.हफिज अ.रहेमान मित्र मंडळाच्या वतीने झेंडा चौकात सर्जेराव पाटील यांची लाडुतूला कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.हफिज अ. रहेमान यांच्यासह सिमा हफिज, तालुका अध्यक्ष शंकरराव कर्हाळे, शेख अलिमोद्दीन, नगरसेवक रविकिरण वाघमारे, खालेद शाकेर, इंदिराबाई साखरे यासह कॉग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, व्यापारी यांची उपस्थिती होती.