एसआरटी च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
एसआरटी च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
संतप्त विद्यार्थ्यांचे उदगिरी कॉलेजात ठिय्या आंदोलन, आगामी परिक्षेवर बहिष्कार
उदगीर(संगम पटवारी) स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या २०१९ च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांसाठी घातक ठरली असून नवीन नियमानुसार विद्यार्थी अडचणीत येत आहेत. शिवाय गुणवत्ताही घसरत असून गेल्या दोन सत्रांमध्ये गुंणवतायादीत मध्ये आलेले विद्यार्थीही या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या नवीन परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार करून मागील सत्रातील परीक्षेचाही पुनर्विचार करावा या मागणीसाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून या नवीन परीक्षा पद्धतीचा निषेध करण्यात आला. नामदार संजय बनसोडे यांना निवेदनही देण्यात आले असुन विद्यार्थ्यांनी आगामी परिक्षेवर बहिष्कार घातला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अचानकपणे मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये ऐच्छिक विषयातील पेपर एकाच दिवशी दोन घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा ताण पडत आहे. नॅकच्या धोरणामुळे वर्ष धावपळीचा गुंतागुंतीचा राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक जबाबदारी मोठ्या प्रमाणात येत आहे शिवाय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर परीक्षेची मोठी जबाबदारी अचानकपणे पडत आहे. या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असून एकाच दिवशी दोन पेपर द्यावा लागत आहे. शिवाय एकाच विषयाचा पेपर असल्यामुळे अभ्यासक्रमामध्ये गोंधळ व संभ्रम निर्माण होत आहे. या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून मागील काळात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी या परीक्षेमुळे अनुत्तीर्ण किंवा कमी मार्क मिळाल्याचे दिसून येत आहे. याचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व पुढील जीवनावर होणार असल्यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.