*हॅप्पी इंडियन व्हिलेजवरील 'हॅप्पी होम' चे नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन.*






*हॅप्पी इंडियन व्हिलेजवरील 'हॅप्पी होम' चे नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन.*

 

 

लातूर - हासेगाव येथील हॅप्पी इंडियन व्हिलेज प्रकल्पावर HIV संक्रमित विवाहित जोडप्यांच्या पुनर्वसनासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उदघाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते तथा निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवार दि . २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता  करण्यात येणार आहे .

 

 हँप्पी होमच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार - लेखक अरविंद जगताप हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेवालय आणि हॅप्पी इंडियन व्हिलेजच्या वाटचाली संदर्भातील  ''नोंदी जागवी आठवणी''  या पत्रकार महारुद्र मंगनाळे लिखित व मुक्तरंग प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे . 

  लातूर पासून जवळच असलेल्या हासेगाव येथे आम्ही सेवक संस्थेच्या वतीने मागील 13 वर्षांपासून एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या मुलांच्या संगोपनासाठी सेवालय आणि  जोडप्यांसाठी  हॅप्पी इंडियन  व्हिलेज  हे दोन प्रकल्प चालविण्यात येतात. एच.आय.व्ही.  संक्रमित विवाहित जोडपे इथे वास्तव्यास आहेत . HIV/ AIDS संक्रमित वावाहित 10 जोडप्यांना राहण्यासाठी समाजाच्या मदतीने नव्याने इमारत बांधण्यात आली आहे.  या कार्यक्रमास जास्तीत जास्त सेवालय व हॅप्पी इंडियन व्हिलेजच्या परिवाराचे पालक, हितचिंतकांनी उपस्थित  राहावे असे आवाहन सेवालयाचे प्रमुख रवी बापटले व सेवालय परिवाराने केले आहे.





 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा