प्लास्टिक जप्तीच्या नावाखाली पाण्याची नासाडी
प्लास्टिक जप्तीच्या नावाखाली पाण्याची नासाडी
हिंगोली - पालिकेच्या वतीने शुक्रवार पासून प्लास्टिक जप्ती मोहीम हाती घेतली आहे.काल पन्नास दुकानावर धाडी टाकून सव्वा दोन क्विंटल प्लस्टिक जप्त करून एक लाखाचा दंड वसूल केला. शनिवारी काही गोदामावर धाडी टाकून पाण्याचे पाउच जप्त करून वाहतूक शाखेच्या लगत असलेल्या भर रस्त्यावर रोलर ने दाबून पाउच ची नासाडी केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
मागील सहा महिन्यांपासून प्लास्टिक मोहीम थंडावली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्लास्टिक साठा करून ठेवला होता.मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेला उशिराने जाग आली. आणि धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी शहरातील बड्या व्यापाऱ्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतली. प्लास्टिक मोहीम राबवायची तर सहा महिन्यांचा कालावधी का सोडला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्लास्टिक जप्ती मोहीम थंडवल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकानात प्लास्टिक साठा केला होता. झोपलेल्या पालिकेला उशिराने जाग आली आणि धडक कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सुर निघाला. शनिवारी दुसऱ्या दिवशी बायपास व अन्य ठिकाणी असलेल्या गुरू प्रकाश प्लांटवर पालिकेने मोर्चा वळवला आणि थेट गोदामावर धाड टाकून हजारो पाणी पाउच रोलर खाली तुडवत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. यावेळी पाणी पाऊच रोलरद्वारे दबाई करीत असताना बघ्यांची गर्दी जमली होती. काही जणांनी तर पाण्याची नासाडी का करीत आहे. असा प्रश्न विचारला तर काहींना तर काहीच कळायला मार्ग नाही. सर्व जण अचंबित होऊन पाण्याची नासाडी होत असल्याचे पाहत असल्याचे चित्र होते.