प्रा.डॉ.सिध्दार्थ तुकाराम सुर्यवंशी यांची महाराष्ट्रभूूषण,जीवनगौरव,समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
लातूूर-लातूर येथील दयानंद विधी महाविदयालयाचे प्रा.डॉ. सिध्दार्थ तुकाराम सुर्यवंशी यांची महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण, जीवनगौरव,समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदरील पुरस्कार हा सामाजीक,राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, उदयोग या कार्यासाठी दिला जातो. हया पुरस्काराचे वितरण दिनांक 16/02/2020 रोजी स्वं.शंकरराव चव्हाण सभागृह,स्टेडियम जवळ, नांदेड येथे होणार आहे.
हया पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण,खासदार हेमंतभाऊ पाटील, खासदार प्रतापराव पाटील
चिखलीकर ,माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे,डॉॅ. मुंकूदराव व्हि पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहेे. तरी या निवडीबददल डॉ.सिध्दार्थ सुर्यवंशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.