शिवजयंतीनिमित्त आजपासून क्रिडा महोत्सवाला सुरुवात


 

लाखोंची बक्षीसे, जय्यत तयारी

 

हिंगोली / प्रतिनिधी

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने पाच दिवशीय शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हॉलीबॉल स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रिडा स्पर्धा १५ फेबु्रवारीपासून सुरु होणार असून लाखो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

 

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पाच दिवशीय छत्रपती उत्सव साजरा करण्यात येत आहे. 

१५ रोजी येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय पारितोषिक सात हजार, तृतीय पारितोषिक पाच हजार बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

१६ रोजी सकाळी ११ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय७ हजार, तृतीय ४ हजार, चतुर्थ ४ हजार व सन्मानचिन्ह तर महिला गटासाठी प्रथम सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय २ हजार ५००, चतुर्थ २ हजार ५०० व सन्मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. 

 

तसेच याच दिवशी सकाळी ८ वाजता येथील जिनिअस स्पोर्टस अकॅडमी एनटीसी भागात बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४०वर्षावरील वयोगट पुरुष दुहेरी, ४० वर्षाखालील वयोगट पुरुष दुहेरी, तर १७ वर्षाखालील वयोगट मुले एकेरी, १७ वर्षाखालील वयोगट मुली एकेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी हजारो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

१७ रोजी विद्यार्थ्यांसाठी खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन येथील राजे संभाजी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

 

 या स्पर्धेसाठी छत्रपती शिवरायांचे सामाजिक विचार हा विषय ठेवण्यात आला असून प्रथम तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार रुपये, तृतीय हजार रुपये, तर पाचशे रुपयाची विशेष तीन बक्षीस व सन्मानचिन्ह ठेवण्यात आले आहेत. १८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यमर्ती सहकारी बॅंक परिसरात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी प्रथम बक्षीस सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार ठेवण्यात आले आहे. तर याच दिवशी छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात दुपारी ४ ते ५ या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण १० हजार रुपयाची बक्षीस ठेवण्यात आले आहेत.

 

 तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिव विचारावर आधारित शिव पोवाडा, शिव गीत, नाट्य संगीत, देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठ एकूण १० हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर या क्रिडा महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा